Thursday, 20 August 2015

महाराज, आम्हाला माफ करा !!!

महाराज आम्हाला माफ करा !!!
_________________________

आपल्या विरोधात लिखाण करणाऱ्याचा सन्मान केलात, तर महाराष्ट्रभर आंदोलने होतील, असा कडक इशारा आम्ही प्रत्यक्षात आणू शकलो नाही, कारण रबर किती खेचायचा, ते आधीच ठरलं होतं महाराज. म्हणूनच आम्ही आदराची, विरोधाची, गोंधळाची आणि सामंज्यस्याचीही भुमिका घेतली होती महाराज. त्याचं श्रेय त्यांचं त्यांनी आणि आमचं आम्ही घ्यावं, हे पूर्वनियोजितच होतं महाराज.

साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्याचं स्वप्न साकारलं होतंत तुम्ही. आज आपलीच माणसं गुलामीत आहेत. विकासाच्या आम्ही फक्त बाताच मारल्या. प्रत्यक्षात ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षात आत्महत्या केल्या महाराज.

शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी विधीमंडळात पाठवता येत नाहीत महाराज. खूप पैसा लागतो महाराज निवडणुका लढवायला. महाराष्ट्रातून निवडून निवडून गुंड, व्यापारी, धनदांडगे यांना तिकीटं द्यावी लागली महाराज. जमीनदार, वतनदार आणावे लागले महाराज पुन्हा. पण हे सगळं तुम्ही आणलेलं स्वराज्य टिकवण्यासाठीच आम्ही केलं महाराज. आम्ही टिकलो, तरच स्वराज्य टिकेल ना महाराज !!

आपल्या महाराष्टाला पुरोगामी विचारांची परंपरा महाराज. अंधश्रध्दांच्या विरोधात रान उठवणारी संत परंपरा लाभलीय आपल्याला महाराज. पण लोकांची फसवणुक होतेच आहे. बायाबापड्या नाडल्या, लुटल्या जाताहेत. तरीही कायदा करण्याची आमची हिंमत झाली नाही महाराज. त्यासाठी दाभोलकरांना मरावं लागलं. आपला खरा इतिहास सांगणाऱ्या पानसरेंचाही खून झाला. त्यांचे खूनी अजूनही पकडले गेलेले नाहीत. पण आम्ही त्याविरोधात महाराष्ट्रात सभा घेतल्या नाहीत. त्याऐवजी आम्ही आपला खोटा इतिहास सांगणाऱ्यांना चर्चेत आणलं. त्यांच्या समर्थकांना पध्दतशीर एकवटण्याचं काम केलं. सन्मानसोहळ्यापूर्वी त्यांना भरघोस पाठींबा मिळवून दिला महाराज. करायला गेलो एक आणि झालं भलतंच महाराज !!!

आपण ज्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य मिळवलंत, त्यांना आजही सामाजिक न्यायासाठी लढावं लागतं. जातिपातीवरून माणसं मारली जातात, जाळली जातात, कापली जातात, स्त्रीयांची सामुहिकरित्या अब्रु लुटली जाते, पण यातलं काहीच रोखू शकलो नाही महाराज. आम्ही मागासांचे जात दाखले मिळवण्याचे नियम आणखी कडक करून टाकले महाराज.

स्त्री ती कोणत्याही समाजाची असो, तिला सुरक्षित सामाजिक वातावरण आम्ही देऊ शकलेलो नाही. स्त्रीया आजही स्वराज्याच्या, स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत आहेत. युवक बेरोजगारीने हैराण आहेत. शिक्षणाचं बाजारीकरण झालंय. लोक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सगळीकडे भ्रष्टाचार, अनागोंदी माजलीय.

आम्ही सत्तेत असताना महाराष्ट्र फक्त लुटला महाराज. आता सत्ता नसताना आम्ही फक्त राजकारण करू शकतो महाराज. कधी आमच्या, कधी त्यांच्या सोयीचं महाराज. आम्ही आपला अपमान करणाऱ्यांना रोखू शकलो नाही महाराज.

महाराज, आम्हाला माफ करा !!!!

- राज असरोंडकर
9850044201

Friday, 7 August 2015

मी श्रेया निमोणकर !!!

काय आहे श्रेया निमोणकर चं वैद्यकीय निष्काळजीपणाचं प्रकरण ? गेल्या ५ वर्षांत काय भोगलं तिने ? ऐका, तिच्याच शब्दांत !!!
________________________________

मी श्रेया निमोणकर. डोंबिवलीत राहते. आज मी माझ्या आयुष्यात आलेल्या वादळाची कहाणी येथे मांडणार आहे. मी सद्या पुन्हा एकदा सायन हॉस्पिटलात एडमिट आहे. माझ्या पोटात प्रचंड दुखू लागलं होतं. सुरवातीला एपेन्डीक्स ची शक्यता वाटत होती. पण आता सोनोग्राफी, स्कैनिंग नंतर निदान झालंय की निष्काळजीपणाने  झालेल्या एका शस्त्रक्रियेचेच दुष्परिणाम म्हणून गाठ तयार झालीय. तिच्याच वेदना होताहेत. सायन हॉस्पिटलचे डॉक्टर अत्यंत नाजुकतेने हे प्रकरण हाताळताहेत. पुन्हा शस्त्रक्रिया टळावी, म्हणून डॉक्टरांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. पुढे काय होणार, या भीतीने आम्ही नवरा बायको भेदरलो आहोत. मुलं चिंतेने ग्रासली आहेत. निर्धास्त आहेत ते फक्त संबंधित डॉक्टर्स आणि सरकारी यंत्रणा !!!
________________________________

2010 साली मला मासिका पाळीचा त्रास होत होता. आमच्या फैमिली डॉक्टरांना कन्सल्ट करुन त्यांनी मला माझ्या आग्रहा (Insist) मुळे महिला स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. सीमा शानभाग यांचे नाव रेफर केले. त्यांनी काही टेस्ट करुन मला 3-4 महीने ट्रिटमेंट दिली व दर महिन्याला मासिक पाळी च्या 3-4 थ्या दिवशी भेटायला बोलवत असत. औषधोपचार काही लागू पडत नाही हे पाहून डॉ. सीमा यांनी सोनोग्राफी व काही चाचण्या केल्यावर, त्या म्हणाल्या कि गर्भ पिशवी काढायला हवी ,नाहीतर कँसर होईल.

मला हा धक्काच होता. 35 क्रॉस केलेय. आत्ताच हे कसे शक्य आहे ? माझा मुलगा 5 वीत व लेक 10 वीला. तिच्या पेपरला रजा हवी म्हणुन मी रजेचे प्लॅनही केले होते.

मी डॉक्टर ना म्हटले कि 4-5 महिन्यांनी करु. लेकीचे अभ्यासाचे दिवस आहेत. तर त्या म्हणाल्या, उशिर झाला तर कैंसर होइल, मग काय करशील.

हल्ली सोपी सुलभ surgery करता येते. hysterectomy म्हणजे दुर्बिणी ने झटपट शस्रक्रिया होतात. थोड़ी खर्चिक आहे. पण 4/5 दिवसात नॉर्मल होउन office लाही जाऊ शकते . so मी डॉ च्या श्री क्रुष्णा मॅटर्निटी अँड नर्सिंग होम मधे एडमिट झाले व् next day लोडशेडिंगचा त्रास नको, म्हणून त्यांनी पहाटेची ऑपरेशनची वेळ ठरवली.

मला त्यांच्या Anesthesiast ने  भूल देताना काहीबाही विचारले व् नंतर मला 6/7 तासाने शुद्धित आल्यावर माझ्या नवऱ्याने सांगितले कि ऑपरेशन टेबलवरच माझे ब्लड प्रेशर वाढले व् मला oxygen वर् ठेवावे लागले व् आश्चर्य म्हणजे ह्या डॉक्टरांनी बाहेरून दुसरे डॉक्टर श्री. उज्वल महाजन यांना बोलावले. माझ्या डॉक्टरांना surgery येत नाहीं व त्याचे instruments ही त्यांच्याकड़े नाहीत. सगळे काही कुणा एका बाहेरच्या डॉक्टरने manage केले. मी अजिबात हा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हते.

जशी शुद्धित आले, तसे मळमळ चक्कर व uneasy वाटायला लागले, तेंव्हा डॉ. सीमा म्हणाल्या, तुला हॉस्पिटलच्या वातावरणाचा त्रास होत असेल . 4 दिवसांनी मी डिस्चार्ज घेउन घरी आल्यावर मला खुप् ढेकर व् उचक्या लागल्या .पोट दुखी ,उलटी असे सगळे त्रास सुरू झाले. परत त्यांच्या कडे गेले. त्या म्हणाल्या, urine ,blood test करा .

हे असे टेस्ट करणे सतत सुरु होते व् urine infection असेल म्हणुन वेगवेगळ्या डॉ. कड़े त्या मला पाठवत राहील्या. gen physician, gen surgeon, urologist, gastroentrologist असे सगळ्या डॉ. ना दाखवत राहिले .

कल्याण येथील urologist डॉ. नंजप्पा यांनी सांगितले, urine tube choke व् crack झाली. त्यात stents टाकावे लागतील. मग 2 दिवस त्यांच्या हॉस्पिटल मधे admit झाले. तेव्हा माझ्या डॉ. सीमा मॅडम व् दुसरे डॉ. उज्वल महाजन (म्हणजे ज्यानी hysterectomy केली ते) दोघेही uroligist च्या हॉस्पिटल मधे हजर होते. तेथे stents टाकून मला under observation म्हणून परत डॉ. सीमा यांच्या nursing home मधे shift केले. नंतर 2 दिवस तिथे एडमिट राहिले .पुढें 4 महीने मला प्रचंड पोटदुखी सतत सुरू राहिली .

urologist डॉ. नंजप्पा यांचे म्हणणे कि foreign part, body मधे adjust होताना त्रास होतो. सहन करा व् pain killer घ्या व् एकदा jaslok ला senior urologist डॉ. पर्सी चिब्बर यांना दाखवा, असे सुचवले.

दरम्यान माझ्या लेकीचे paper सुरू झाले व् मी त्या पुर्ण दिवसात high painkiller वर् राहिले कारण तिचे महत्वाचे वर्ष होते आणि थोडयाच दिवसांचा प्रश्न होता . तिच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी मी तिला परीक्षा सेंटरवरुन सरळ jaslok ला घेउन गेले  तिथल्या यूरोलॉजिस्ट डॉ. चिब्बर यांनी CT Scanning व् काही tests सांगितल्या. त्यां 2 दिवसांत केल्या, तेव्हा ते म्हणाले, बहुदा दोन्ही kidneys खराब झाल्या आहेत. open surgery करावी लागेल, मगच कळेल की एक की both the kidneys are damaged.

मी व् माझा नवरा हादरलो. आता पर्यंत 2 surgery न औषध व एवढे डॉ व् इतक्या tests... ह्या सगळ्यात खूपच खर्च झाला म्हणून सरळच विचारले कि हया surgery ची खात्री असेल का ? ते म्हणाले, no guarantee आणि ख़र्च minimum rs.5 /7 lakh depending on the which stage it is .

दोघेही सुन्न झालो . घरी आलो तेव्हा काहीच सुचत नव्हतं. nursing home मधे डॉ सीमा मॅडम ना भेटलो. त्या म्हणाल्या, काय करायचे ते ठरवा. urologist शी बोलते, पण ते काही discount देणार नाहीत. लीलावती, हिंदुजा कुठेही खर्च होणारच .आत्ता पर्यंतचा ख़र्च व् आजार बघता आम्हाला मुलांच्या भवितव्याची सोय पाहुन जाणीवपूर्वक निर्णय घेणे जरूरी होते. त्या रात्री झोपले, म्हणजे डोळे मिटुन पडले. झोप होती कुठे?

सकाळी मला जाग आल्यावर डोळेच उघडेनात. आरशासमोर उभी राहिले तर लक्षात आले कि पूर्ण शरीर सुजले आहे . मी घाबरले डॉ. सीमा मॅडम कड़े धाव घेतली. त्यांनी urologist डॉ. नंजप्पा यांना फ़ोन केला, तर ते अहमदाबाद येथे सेमिनार ला गेले, म्हणून 2 दिवस भेटणार नव्हते .

मी घरी आले व् खूप रडले. 2 दिवस आतून पुर्णपणे फट्टू झाले होते. पण मुलाना व् नवर्‍याला अजुन tension नको म्हणून आव आणून normal रहाण्याचा प्रयत्न करत होते .

2  दिवसांनी urologist डॉ. नंजप्पा यांना भेटले. मला पाहून ते उडालेच. "go to some big institute now " असे म्हणाले . मला वाटले stents काढून टाकावे का ? पण urologist म्हणाले "it may be a crime now" त्यांनी ही आपले कर्त्तव्य म्हणून मला Saifee hospital चा reference दिला .5000/ कमी होतील, जे काही बील होईल, त्यावर असे ही सांगितले.

मग आम्ही घरी आलो न माझ्या डॉ सीमा मैडम ना कळवले. त्याना आमचा " sion hospital" ला जायचे ठरवल्याचे चे सांगितले .
दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉ. सीमा मैडमने त्यांची कार व् ड्राईवर पाठवले सायनला जायला. मुलांची 5/6 दिवसात परत येते, अशी समजुत घातली .

धाकटया मुलाची परीक्षा सुरू झाली होती. घरातून बाहेर पड़ताना उद्विग्न मनःस्थितीत होतो-

sion hospital ला पोहोचलो. urology चे head डॉ. अजित सावंत सरांनी मला तपासले व् तातडीने admit व्हायला सांगितले. एडमिट करायला बरेच सोपस्कार करावे लागले नवर्‍याला. महिला वार्ड मधे भर्ती झाले. नवरा चटई टाकून वार्ड च्या बाहेर passage मधे झोपला. पुढे 2 महीने असेच काढले त्याने.

दुसऱ्याच दिवशी सकाळीच् surgery केली (PCN) . सायन हॉस्पिटलच्या Urology dept. च्या डॉक्टरांनी किडनी मधे पाठीतुन 2 ट्यूब घातल्या. ट्यूब चे एक टोक किडनीत तर दूसरे टोक पाठीतुंन बाहेर काढून त्याला urine bag लावली व urine bypass केली. 8 दिवस urine चे reading घेतले . मग तिथुन TATA हॉस्पिटलमध्ये Rehnal function test करायला  पाठवले. माझ्या किडण्या वाचल्या ...
आता पुढे मोठी surgery करायची ठरली. डॉक्टरांनी नवर्‍याला बोलावून सांगितले कि open surgery करणार तेव्हाच कळेल आतील प्रॉब्लम.

सकाळी operation ला सुरुवात झाली तेव्हा एक injection ने भुल दिली ...
9 तास ऑपरेशन चालले.

दोन्ही ureters damage (strictures)झाले होते. ते कापून टाकले व माझ्या आतड़याचा 20 cm part कापून तिथे लावला.... (ILEAL SURGERY) पोटात urine leak होउन सगळे आतडे चिकटले होते त्यामुळे त्यांनी Mobilise करायला पोटात खुप gases सोडले त्यामुळे व इतक्या वेळ पोट उघडे रहिल्याने ते बंद करता येईना म्हणून कच्चे टाके घालुन फक्त वरची कातडी शिवली व मला ventilator वर हलवले.

नवरा देवाचा धावा करत होता. डॉ. सावंत सरांनी त्याला explain केले "critical case आहे  खुप गुंन्तागुंत होती. पुढिल 5-6 दिवस ventilator वर ठेवू ,वाचली तर पुढची ट्रीटमेंट करू".
सुदैवाने दुसऱ्याच दिवशी मी शुद्धिवर आले. मग पुढील 8 दिवसांनी परत 4 तास लागले, पक्के टाके घालायला. ह्या 2 महिन्यातले 8 दिवस सोडल्यास माझ्या संपूर्ण शरीरात तब्बल 10 ते 14 नळया होत्या .

मी सुखरूप आहे. पण कायम दर 2 ते  2  1/2 तासांनी यूरिन पास करणे गरजेचे आहे . दर 4 महिन्यानी sonography, urine व् blood test करुन sion hospital ला follow up ला जावे लागते.

हे मी "हयात"असेपर्यन्त सुरु रहाणार.  ह्या सर्व दरम्यान मुले ,घर ,नवरा त्याची नौकरी सगळ्याची हेळसांड झाली.
Hysterectomy  करताना माझ्या दोन्ही मूत्रनलिकाना ईजा झाली होती. हे sion hospital ला admit झाल्यावर तिथल्या डॉक्टरांनी सांगितले.

माझ्या डॉ मॅडम ने आम्हाला ह्या बाबतीत काहीही कळु दिले नाही. व जवळ जवळ 4 महीने काहीबाही घरगुती उपाय सुचवत राहिल्या व बऱ्याच इतर डॉ कडे refer करत राहिल्या.

मी  sion hospital वरुन 50 दिवसांनी discharge घेवुन घरी आल्यावर डॉ. सीमा मला भेटायला आल्या.
खुप आपुलकी दाखवुन म्हणाल्या "I owe you my entire life,  मला तुमच्या त्रासा ची कल्पना आहे. दर 2 ते 2 1/2  तासाने urine pass करायला उठायचे म्हणजे रात्रीची झोपमोड ही होणार. "Better to use ADULT DIAPER" हा विचित्र पर्याय उपाय होऊ शकतो का ?? मी काही braindead नाही मला Sense आहे. हा उपाय माझ्यासाठी तरी नाही. आम्ही त्याना ह्या वर आमचे मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसाना बद्दल बोललो व आमचा कायदेशीर कारवाई करण्याचा विचार आहे, असे सांगितल्यावर त्या म्हणाल्या "मला ही मुलंबाळ आहेत, मला कल्पना आहे तुमच्या सर्व त्रासाची. त्यामुळे मी माझ्याकडून जमेल ती मदत करेन". मला त्यांनी 2 दिवसांची वेळ मागितली व काय best करू शकते, ते कळवते, असे म्हणाल्या.

दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांचा फ़ोन आला. तेव्हा त्या म्हणाल्या "तुला काय करायच ते कर. Medical council वगैरे माझे काही वाकडे करू शकत नाही. मी तुला काहीही मदत करणार नाही, एक पैसा ही देणार नाही. you can do whatever you want."

मग मात्र मी ठरवले आता legal way ने जाऊ. तशी तक्रार Maharashtra medical council ला व consumer court(CST) मधे केली. Medical council मधे माझी केस 2012 सालापासून अशीच pending आहे without any action, as she had warned me.......

Consumer court मधे judges ना मेडिकल terms समजत नसल्यामुळे व काही गोष्टी MANAGE होत असल्यामुळे 3 /4 महीने पुढची तारीख मिळते.

खुप वेळा हताश होते आपल्या ह्या सिस्टममुळे, ढेपाळते ही. कारण डॉ. सीमा तर ऊजळ माथ्याने त्यांची प्रेक्टिस करत आहेत व त्रास फक्त मीच भोगते आहे. त्यांना काहिही करता येत नाही कि त्यांची प्रेक्टिसही थांबवता येत नाही. पण मग विचार करते, मी नशीबवान आहे की मी जिवंत आहे, माझ्या मुलांसोबत, माझ्यासाठी अतोनात कष्ट घेऊन मरणातुन खेचून आणणार्या माझ्या नवर्यासोबत आहे. तेवढे पुरेसे आहे. पण म्हणतात ना म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. मी अन्यायाविरुद्ध लढते त्यात काहीच चुकीचे नाहीये ना ? गप्प बसले असते तर क्लेश, मनस्ताप झाला असता. त्यापेक्षा मी प्रामाणिक प्रयत्न करते आहे म्हणून मला समाधान आहे.

मी ह्या संदर्भात ज्या डॉ ना भेटले त्यात काही असे मोठे थोर डॉ आहेत, ज्यांनी मला सल्लारूपी warning दिली की समजा road accident मधे एखाद्या ट्रक ने उडवले असते तर काय केले असते ??? So just forget it. एक महाशय तर म्हणाले की पैसे देऊन गुंडांकडून हया डॉ कडून भरपाई वसूल करा.

आश्चर्य वाटते क़ी माझ्याकड़े कामाला येणाऱ्या बाईच्या हातून काचेची बरणी फुटली तर ती म्हणाली "माझ्या पगारातून कापून घ्या ताई"
पण ह्या सुशिक्षित व आर्थिक दृष्टया सक्षम असणाऱ्याना इतकीही जाणीव असु नये ???

माझा खुप विश्वास आहे, प्रथम देवा वर व नंतर sion हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांच्या टीमवर ,ज्यानी मला ह्या प्रकरणात सर्वतोपरी सहकार्या साठी आश्वस्त केले आहे ...म्हणून भले देर सही सवेरा तो होना ही है. आणि तुम्हां सर्व स्नेही व हितचिंतकांच्या शुभेच्छा व आशिर्वाद आहेतच.

इथे हे सर्व पोस्ट करण्याचा हेतु इतकाच की आपण सजग व्हा. आम्हाला झाला, तसा त्रास कुणालाही होऊ नये.. "खरंच गरज आहे का"?
हा प्रश्न डॉ ची पायरी चढ़तानाच सतत स्वतःला विचारत रहा.

-सौ. श्रेया मिलिंद निमोणकर-  ७२०८३३६७४२.

श्री. मिलिंद निमोणकर ९९३०९३३३२५

��➡
Pls click on below link to visit our page, like and invite your friends.

https://m.facebook.com/shreyafightsback

श्रेया, तू एकटी नाहीस !!!!

डोंबिवलीच्या श्रेया निमोणकरचं पुन्हा हॉस्पिटलला एडमिट होणं आम्हा सगळ्यांना धक्कादायक होतं आणि मनात भीतीचं काहूर निर्माण करणारं. श्रेया आहेच इतकी गोड कि तिने फक्त आणि फक्त हसत राहावं, असं अगदी तिच्या शत्रूलाही वाटावं. अत्यंत निर्मळ मनाची. खेळकर, खोडकर, मनमिळाऊ...कळल्याबरोबर धावतपळत सायन हॉस्पिटलला गेलो. ती नेहमीप्रमाणेच मनमोकळी हसली, पण तिच्या चेहऱ्यावरचा तणाव लपला नाही. तो लपणं शक्यही नव्हतं. इतकं सहज नव्हतं ते. श्रेयाचा आधीचा अनुभव भयावह होता. मासिक पाळी नियमित येत नाही, म्हणून डोंबिवलीतील डॉ. सीमा शानबाग ह्या स्त्रीरोगतज्ञाकडे सुरु केलेले उपचार, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे , श्रेया निमोणकर यांना  मरणाच्या दारात घेऊन गेले. इच्छाशक्तीच्या जोरावर ती मृत्यूशी झगडली, पण आयुष्य खडतर झालं. धक्कादायक गोष्ट हि की डॉक्टर अद्यापही निष्काळजीपणाची जबाबदारी मात्र घ्यायला तयार नाहीत.

श्रेया आणि तिचा नवरा मिलिंद यांनी जंग जंग पछाडलं. अथक पाठपुरावा केला. डॉक्टरांनी केलेली हेळसांड कागदावर अवतरली, पण निष्काळजीपणासाठी डॉक्टरांच्या मुसक्या आवळेल, असा कायदा आपल्या देशात नाही. प्रकरण ४ वर्षे झाली, ग्राहक न्यायालयात सुरु आहे आणि मेडिकल कौन्सिल मध्ये सुद्धा. स्थानिक पोलीस ठाण्यापासून ते मंत्रालयापर्यंत शेकडो चकरा झाल्या. कार्यवाहीचा प्रत्येक क्षण श्रेया-मिलिंद ने पुढे सरकवला, तेंव्हाच पुढे सरकला. ४ वर्षात तो कधीच स्वत:हून जागचा हालला नाही. प्रचंड मनस्ताप, आर्थिक भुर्दंड दोघांनी सोसला. दोघांची नोकरी गेली. घरात दोन शिकणारी मुलं. एका बाजूला त्यांची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला न्यायासाठी लढाई.

डॉक्टरांच्या चुकीमुळे श्रेया आज कृत्रिम मूत्रविसर्जन व्यवस्थेवर अवलंबून आहे. दर दोन अडीच तासाला तिला लघवीचा त्रास आहे. आयुष्यभर तिच्या सोबत.

डॉ. सीमा शानबाग यांना त्यांनी सारा प्रकार सांगितला तेंव्हा, त्यांनी सुरुवातीला सहानुभूती दाखवली, पण नंतर "तुम्हाला जे करायचं ते करा, माझं कोणी काही वाकडं करू शकणार नाही " असं त्यांनी ऐकवलं. बेपर्वाई तर होतीच, आता माणुसकीही उरली नव्हती. डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे. त्याच्याकडूनही चूक होऊ शकते, हे मान्य. पण झालेली चूक,  कबूल करण्याचा मनाचा मोठेपणा नसल्याने,  तिची जबाबदारी स्वीकारण्यात झालेली डॉक्टरांची गफलत श्रेयाच्या जीवावर उठली. प्रश्न केवळ डॉक्टरांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेचा नव्हता, तर एका हसत्याखेळत्या माणसाचा होता, हेच नेमकं डॉक्टर विसरले.

श्रेयाची लढाई सुरु आहे. न्याय प्रक्रिया कासवाच्या गतीने हलतेय आणि डॉक्टरांचा व्यवसाय मात्र , जणू काही काहीच घडले नाही, या अविर्भावात जोमात सुरु आहे. कारण समाजही ढोंगी आहे. स्वतःवर आल्याशिवाय तो जागा होत नाही. आणि सरकारला कारवाईची पावलं उचलायला कित्येक बळी लागतात.

श्रेया आता पुन्हा हॉस्पिटलात एडमिट आहे.  तिच्या पोटात प्रचंड दुखू लागलं होतं. सुरवातीला एपेन्डीक्स ची शक्यता वाटत होती. पण आता सोनोग्राफी, स्कैनिंग नंतर निदान झालंय की निष्काळजीपणाने  झालेल्या शस्त्रक्रियेचेच दुष्परिणाम म्हणून गाठ तयार झालीय. तिच्याच वेदना होताहेत. सायन हॉस्पिटलचे डॉक्टर अत्यंत नाजुकतेने हे प्रकरण हाताळताहेत. पुन्हा शस्त्रक्रिया टळावी, म्हणून डॉक्टरांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. पुढे काय होणार, या भीतीने दोघे नवरा बायको भेदरले आहेत. मुलं चिंतेने ग्रासली आहेत. निर्धास्त आहेत ते फक्त संबंधित डॉक्टर्स आणि सरकारी यंत्रणा !!!

कायद्याने वागा लोकचळवळ यावर जनतेचा कौल मागते आहे. डॉक्टरांनी सदर प्रकरणात जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांच्यावर दबाव निर्माण करावा लागेल.  राज्य सरकारकडे विशेष समिती नेमून वेगवान चौकशीची मागणी करावी लागेल. ही चौकशी जास्तीत जास्त महिनाभरात पूर्ण व्हायला हवी, म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल. रुग्णांच्या तक्रारींबाबत हेळसांड होणार नाही, अशी यंत्रणा उभी करण्यासाठी लोकआंदोलन उभारावे लागेल. निष्काळजीपणा करणारे, तो लपवणारे, बेपर्वाईने वागणारे, नुकसानभरपाईची जबाबदारी झटकणारे डॉक्टर्स कायद्याच्या कक्षेत आलेच पाहिजेत, यासाठी मोठा लढा उभारावा लागेल. जसा डॉक्टरांच्या संरक्षणाचा विशेष कायदा आहे, तसा तो रुग्णांच्या संरक्षणाचासुद्धा असला पाहिजे, हे सरकारला ठासून सांगावं लागेल. श्रेयाची लढाई त्यासाठीच आहे. श्रेयाची लढाई समस्त महिलांची लढाई आहे. ती समस्त रुग्णांची लढाई आहे. ती एकटी नाही, हा विश्वास तिला महाराष्ट्र देणार आहे कि नाही, हा आमचा सवाल आहे.

- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

अधिक माहितीसाठी संपर्क :

श्रेया निमोणकर
+917208336742

मिलिंद निमोणकर
+91 99309 33325