Saturday, 20 February 2016

जेएनयु झिंदाबाद !!!

ये  ( एबीवीपी ) जो लोग हैं, इनकी सच्चाई जान लिजिये. इनसे नफरत मत किजियेगा क्योंकी हम लोग नफरत नहीं कर सकते.

मुझे बडी ही दयाभाव है इनके प्रती. ये जो उछल रहे है. इनको लगता है, जैसे गजेंदर चौहान को बिठाया है, वैसे हर जगह चौहान, दीवान, फर्मान ये जारी कर देंगे. इस चौहान, दीवान, फर्मान की बदौलत ये हर जगह नौकरी पाते है. इसलिये ये जब भारतमाता की जय चिल्लाये, तो समझ ले की परसो इनका इंटरव्ह्यू होनेवाला है.

नौकरी लगेगी, नौकरी लगेगी, देशभक्ती पिछे छुटेगी. नौकरी लगेगी, भारतमाता का कोई खयाल नहीं. नौकरी लगेगी, तिरंगा को तो इन्होंने कभी माना ही नहीं, भगवा झंडा भी नहीं पालेंगे.

मैं सवाल करना चाहता हुं, ये कैसी देशभक्ती है, अगर एक मालिक अपने नौकर से सहीं बर्ताव नहीं करता, किसान अपने मजदूर से सहीं बर्ताव नहीं करता, अगर पुंजीपती अपने एम्प्लॉयमेंट से सहीं बर्ताव नहीं करता, जो अलग अलग चैनल के लोग है, जो पत्रकार काम करते है, १५-१५ हजार रुपयें में, उनके जो सीईओ है, वो इनसे ठीक से बर्ताव नहीं करते.

कैसे देशभक्त है, आपकी देशभक्ती भारत-पाक कें मैच में खतम हो जाती हैं. इसलिये जब लौट के निकलते है, तो केलेवाले के साथ बदतमीजीसे बात करते हैं. केलावाला कहता है, साहब ४० रुपया डझन, कहते है, भाग, तुम लुट रहे हो, ३० का दे दो. केलावाला अगर पलटकर जवाब दे देगा ना, तुम सबसे बडे लुटेरे हो, करोडो लूट रहे हो, तो कह देंगे की ये देशद्रोही हैं.........

मै बहोत सारे इनमेंसे दोस्तो को जानता हुं, इनको पुंछता हुं, क्या सचमुच तुम्हारे अंदर देशभक्ती पनपती है ? तो कहता है, भैय्या क्या करे, पांच सालकी सरकार है, दो साल खत्म हो गये है. तीन साल का टॉकटाईम बचा है. जो करना है, अभी कर डालना है. तो हमने बोला, भाई करलो. लेकिन एक बताओ, जेएनयु के बारेमें अगर झुठ बोलोगे, तो कल तुम्हाराही कोई साथी पकड लेगा, जो आजकल ट्रेन में बीफ चेक करता है. पकड करके तुमको क्लीनचीट करेगा, कहेगा तुम देशभक्त नहीं हो, तुम तो जेएनयुवाईट हो. इसका खतरा समझते हो ?

बोले समझते है भैय्या, इसलिये हमलोग जेएनयु शटडाऊन का जो स्टैग है, उसका विरोध कर रहे है. हमने कहां, बहोत बढियां है, भाईसाहब, पहले जेएनयु हैशस्टैग के लिये माहौल बनाओ, फिर उसका विरोध करो,  क्योंकी रहना तो जेएनयु में है.

इसलिये मै आप तमाम जेएनयु के लोगो को कहना चाहता हुं, के अभी चुनाव होगा मार्च में, और एबीव्हीपी के लोग, ओम का झंडा लगाकर आप के पास आयेंगे, तो उनसे कहियेगा. हम देशद्रोही है, हम देहाती आतंकवादी है, हमारा वोट लेके तुमभी देशद्रोही बन जाओगे. ये उन से जरुर पुछियेगा. तो कहेंगे, नही नही आप लोग नहीं है, वो कुछ लोग है. तो कहना, वो कुछ लोग थे, ये बात तो तुमने मिडिया में नहीं कहीं. तुम्हारा वाईस चान्सलर भी नहीं बोला और तुम्हारा रजिस्ट्रार भी नहीं बोल रहां है.

वो कुछ लोग भी तो कह रहे है कि हम पाकिस्तान झिंदाबाद नहीं लगाये है. हम आतंकवाद के पक्ष में नहीं है. वो कुछ लोग भी तो कह रहे है कि हमारा परमिशन देकर कि परमिशन कैन्सल कर दिया. ये हमारे डेमोक्रेटिक राईटपर एटैक हो रहां है. वो कुछ लोग जो कह रहे है कि इस देश के अंदर कहीं लडाई चालु है, तो हम उस लडाई के समर्थन में खडा होंगे. इतनी बात इनके पाले पडनेवाली नहीं है.

मुझे पुरा भरोसा है, इतने लोग जो इतने शॉर्ट नोटीसपर यहां आये है, उनके पाले पड रहां हैं. कि एबीवीपी ना इस देश को तोड रहां है, बल्कि जेएनयु को तोड रहां है. लेकिन हम जेएनयु को टुटने नहीं देंगे. जेएनयु झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा......

कन्हैय्याकुमार
विद्यार्थी नेता, जवाहरलाल नेहरु युनिव्हरसिटी.

Saturday, 13 February 2016

आयतं कोलीत

आयतं कोलीत !!!

मृत्यूदंडाला विरोध करण्यासाठी देशात सर्वसामान्यांची कित्येक उदाहरणे असतील. पण अफझल गुरु, कसाब, मेमन यांची कड घेऊन भाजपासारख्या संधीसाधू पक्षाच्या आणि त्यांच्या उन्मादी सहकारी संघटनांच्या हातात आयतं कोलीत देणं हा राजकीय मूर्खपणाच आहे. विधी आयोगानेही १४० राष्ट्रांचा हवाला देत फाशीला विरोध केलाय, पण देशविघातक आणि दहशतवादी कृत्यांसाठी आयोगाने दया दाखवलेली नाही. स्वातंत्र्यापासून आजवर किती लोकांना फाशी झाली हा आकडा विवादित आहे. पण तो खूप मोठा दखलपात्र नाही. राष्ट्रीय मुद्दा करण्याइतपत निश्चितच नाही. अफझल गुरु, याकूब मेमन, कसाब यांना झालेल्या फाशीवरुन चर्चा घडवून आणण्याच्या प्रयत्नांना व्यापक पाठींबा मिळूच शकत नाही. ते दहशतवादी कारवायांत गुंतलेले आहेत. भारताविरोधातील छुप्या युध्दात ते सहभागी आहेत. या देशांतल्या हजारों निरापराधांचे त्यांनी क्रुरतेने जीव घेतलेले आहेत आणि हे सगळं त्यांनी भारताचा शत्रू असलेल्या पाकीस्तानच्या इशाऱ्यावरुन केलेलं आहे. त्यांचा संदर्भ घेऊन मृत्यूदंडाला विरोध करण्याचं राजकारण शंभर टक्के अंगलटीला येणारंच होतं, ते आलेलं आहे. पाकीस्तान झिंदाबादच्या घोषणा अभाविप कार्यकर्त्यांनीच दिल्या, असाही दावा केला जातोय. तो खराही असू शकतो. ती मंडळी असल्या षडयंत्रात बाकबगार आहेत. पण त्यांना अफझल गुरुचा स्मृतीदिन साजरा करुन पुरक वातावरण कोणी बनवून दिले ? अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय संविधानाने जरुर दिला आहे, पण त्यालाही संविधानिक मर्यादा आहेत. भारतीय संविधानात परिच्छेद १९(१) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य प्राप्त असलं तरी १९ (२) मध्ये या स्वातंत्र्याच्या मर्यादा नमूद करण्यात आल्या आहेत. राष्ट्राची एकात्मता, सुरक्षितता, कायदा-सुव्यवस्था, सभ्यता, परकीय संबंध, सैनिकी गोपनीयता यांच्याशी तडजोड करणारं अभिव्यक्ति स्वातंत्र्य संविधानाला अपेक्षित नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणीतरी काहीतरी राजकीय स्वार्थापोटी लहरीपणा करायचा आणि त्याच्यामागे आपण भरकटत जायचं, हा नक्कीच विवेकवाद आणि राजकीय मुत्सद्देगिरीही नाही.

- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

Friday, 12 February 2016

माझा गणेशभक्त मित्र !!!

माझा एक मित्र गणपतीचा निस्सीम भक्त आहे.

घरातल्या देव्हाऱ्यात गणपतीचा हाताच्या पंज्यावर मावेल, एवढा फोटो आहे, त्याला रोज सकाळी नमस्कार केल्याशिवाय, तो घराबाहेर पडत नाही.

रात्री झोपण्यापूर्वी नमस्कार केल्याशिवाय, अंथरुणात शिरत नाही.

काल भेटायचं ठरलं, तर मी म्हटलं, माघी गणपतीत बिजी असशील !!!

तर तो म्हणाला, नाही रे. मी काही करत नाही, कुठले उत्सवबित्सव. आणि कुठे जातही नाही.

तो म्हणाला, तुला विश्वास बसणार नाही, पण मी टिटवाळा, सिध्दिविनायक, दगडुशेट अशा स्पेशल गणपतींचंही कधी दर्शन करत नाही. केलेलं नाही.

तो म्हणाला, तू मान अथवा नको मानू, पण माझी गणपतीवर पूर्ण श्रध्दा आहे. मी आज जो काही आहे, तो गणपतीमुळेच आहे. तो घरात मनोभावे साधा नमस्कार केला तरी पावतो, याचा मला विश्वास आहे.

मग इतके लोक जे मंदिरांत रांगा लावतात, नवस, उपासतापास करतात, त्यांचं काय, असं मी विचारलं, तेव्हा तो म्हणाला, या लोकांचा स्वत:वरही विश्वास नाही आणि देवावरही नाही. असले लोक स्वार्थासाठी शंभर देवांना पुजतात, देव, मंदिरं बदलत राहतात. याच लोकांनी देवधर्माचा तमाशा करुन टाकलाय.

मी घरातला गणपती तरी का पुजतोस, असा प्रश्न माझ्या मित्राला विचारला नाही. तसा तो विचारणंही संयुक्तिक नव्हतं. तो विवेकी मार्गावरचाच प्रवासी आहे, हे मी समजून घेतलं होतं.

भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तिला धर्म आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दिलंय. तसे ते माझ्या मित्रालाही होतं. किमान अशा मित्रांच्या तरी श्रध्दा दुखावू नयेत, असं माझं ठाम मत आहे.

- राज असरोंडकर
कायद्याने वागा लोकचळवळ

Tuesday, 9 February 2016

नगरसेवकांच्या अपात्रतेचं काय ?

अशा नगरसेवकांच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी ?
_______________________________

अनधिकृत बांधकामांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग दिसून आल्यास नगरसेवकांना पदावर राहण्यास अपात्र ठरवणारी तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात आहे.

पण या तरतूदीची स्वयंस्फूर्तीने अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महाराष्ट्र शासन स्तरावरही होत नाही.

महाराष्ट्रात अनेक महानगर पालिकांतील नगरसेवक अनधिकृत बांधकामांसाठी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेले आहेत. तरीही, कोणाचेही सदस्यत्व शासनाने रद्द केलेले नाही.

अनेक नगरसेवक अनधिकृत बांधकामांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुंतलेले असतात. महापालिका प्रशासनाकडे त्याचे सबळ पुरावे असतात. निष्कासन कारवाईच्या वेळी नगरसेवकांनी अडथळे आणल्याच्या नोंदी पंचनाम्यात असतात. व्हिडियो चित्रीकरणात नगरसेवक कैद झालेले असतात. कर्मचारी-अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे, हल्ले केल्याचे पोलिसांत गुन्हे दाखल होतात. अनेकदा नागरिक अनधिकृत बांधकामांबाबत नगरसेवकांविरोधात पुराव्यांनिशी तक्रारी करतात. पण कोणाचीही अपात्रता होत नाही.

कल्याण-डोंबिवलीसारख्या ठिकाणी एखाद्या राजकीय पक्षाला हुलपट्टी करण्यासाठी अपात्रतेच्या तरतूदींचा वापर होताना दिसतो. सत्तेच्या साटेलोट्यात या तरतूदी निष्प्रभ ठरताना दिसतात.

नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. नगरविकास विभागाने ते वेळोवेळी स्पष्ट केलेले आहे. पण राजकीय पक्षांकडून सतावले जाण्याचे भीतीने महापालिका आयुक्त हतबल असतात. ज्यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलावा, तेच महाभाग नगरसेवकपदाचा गैरवापर करून, अधिकाऱ्यांविरोधात महासभेत आरोप करताना, आंदोलनाच्या धमक्या देताना, उपोषणे करताना दिसतात.

जी प्रकरणे मा. मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत, तीच राजकीय हितसंबंधांमुळे निकाली निघत नाहीयेत. त्यात अधिकचा मनस्ताप कशाला, असा सोयीस्कर पवित्रा महापालिका आयुक्त घेताना दिसतात.

अशा वेळी प्रश्न पडतो, या नगरसेवकांच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी ? महापालिका अधिनियमांतील तरतूदींचं करायचं काय ? लोणचं घालायचं ?

- राज असरोंडकर
संस्थापक-अध्यक्ष,
कायद्याने वागा लोकचळवळ
9850044201/7666644201
kaydyanewaga@gmail.com