Monday, 27 June 2016

देश मोठा की जातधर्म ?

*देश मोठा की जातधर्म ?*

उत्तरप्रदेशातील शिकोहाबादमधील नगला केवल गावात राहणारे सीमेवरील जवान हेड कॉन्स्टेबल वीर सिंग जम्मु काश्मिरमधील पम्पोरमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झाले. तिरंग्यात लपेटलेलं त्यांचं पार्थिव गावात आणण्यात आलं, तेव्हा सरकारी यंत्रणेला जबर धक्का बसला, जेव्हा त्यांना कळलं की शहीद वीर सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास गावातल्या दांडगट लोकांचा विरोध होता का तर शहीद वीर सिंग हे त्यांच्या दृष्टीने खालच्या जातीचे होते...!!!

मुळात, देशासाठी कामी आलेली शहादत जातीय दृष्टीने मोजणारी व इतक्या नीचपणे खालच्या स्तरावर विचार करणारे लोक स्वत:ला उच्च कसे काय समजतात ?

एका बाजूला वीरसिंगचा अवघा अठरा वर्षाचा नवयुवक मुलगा सैन्यात जाऊन आतंकवाद्यांचा खातमा करण्याच्या घोषणा करतोय आणि दुसऱ्या बाजूला गाव मागास जातीतील म्हणून शहीदाच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देत नाही !!! किती घाणेरड्या मनोवृत्तीच्या लोकांचा देश आहे हा ...!!! आधुनिकतेच्या दांभिक बाता मारणारा !!!

*देशभक्तीपेक्षा जातीयवाद वरचढ कसा असू शकतो* *?* 

गावातल्या जातीयवादी लोकांचा देशस्तरावर जोरदार निषेध झाला पाहिजे !!!

करणार स्पष्ट शब्दांत निषेध की इथेही पणबिन, किंतुपरंतुचे सोयीस्कर जंतू वळवळणार भल्या भल्या देशभक्तांच्या लेखणीतून...???

*उत्तरप्रदेशातील शिकोहाबाद येथील नगलाकेवल गावातील शहीदाच्या अंत्यसंस्कारासाठी जातीवरुन जागा देण्यास विरोध करणाऱ्या देशद्रोह्यांचा निषेधअसो....!!!*

कायद्याने वागा लोकचळवळ

No comments:

Post a Comment