तोकड्या कपड्यात
हरवलंय ब्राम्हण्य ???
अपर्णा रामतीर्थकर यांना
चिंतेने झोप नाही !!!
________________________________________________________मुलीला आपण मुलांसारखं वागवूच शकत नाही. मुलांना तरी भान असतं, पण मुलींना नसतं, असं अपर्णा रामतीर्थकर ठामपणे सांगतात.
आता ह्या रामतीर्थकर कोण ? भारतीय संस्कृतीच्या कट्टर पुरस्कर्त्या आहेत त्या. एकत्र कुटुंबपध्दती टिकावी म्हणून धडपडत असतात. ठिकठिकाणी जाऊन भाषणं करतात. सनातनवाद्यांचा त्या "बोलका पोपट" आहेत, असं सुधारणावादी म्हणतील. पण मुलगी शिकून काय करणार, असं जिच्या आईने लहानपणापासून शिकवलं आहे, तिच्याकडून फाजील अपेक्षा कशाला कराव्यात ? "आई" होऊनच अपर्णा ताई भाषणं करत असल्याने त्यांची भाषा त्यांच्या आईची आहे.
मुली तोकड्या कपड्यात वावरतात, याचा अपर्णाबाईंना खूप राग आहे. हल्ली उघड्या राहणाऱ्या मुलींमध्ये ब्राम्हण मुलींची संख्या जास्त आहे, याची भयंकर चिंता अपर्णावहिनींना आहे. त्याचं कारण, त्यांना लाज नाही, असं अपर्णाआजी म्हणतात. मुलींच्या आईलाच कपड्यांचं भान नसेल, तर मुलींना कुठून येणार, कशात मोजायचं तुमचं ब्राम्हण्य, असा रोखठोक सवाल त्या करतात. मुलींच्या बेछुट वागण्याला आई जबाबदार आहे, कारण ती मुलींना काही शिकवत नाही. असं त्यांचं म्हणणं.
शिक्षणामुळे मुलींमध्ये इतका आगाऊपणा आला आहे, असं अपर्णामावशींना वाटतं. मुलींचं लग्न करायचं असेल, तर त्यांना पाय जमीनीवर ठेवायला शिकवा, असा सल्ला अपर्णाआत्या देतात.
अपर्णादीदी भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचं काम करतात. त्यांच्या मते उंबरा हीच स्त्रीयांसाठी भारतीय संस्कृती आहे. उंबरा म्हणजे मर्यादा, असं त्या उघडपणे सांगतात. मुलगी म्हणजे कुटुंबाचा विश्वास आहे, कुटुंबाची प्रतिष्ठा आहे. बापाला समाजात ताठ मानेने चालता आलं पाहिजे, असं मुलीचं वर्तन हवं, यावर अपर्णानानी जोर देतात.
____________________________________आता प्रश्न इतकाच आहे की सुधारणावाद्यांनी उंबरा संस्कृतीला विरोध केला नसता, तर अपर्णामैडम त्या सनातन संस्कृतीचं समर्थन करत गावोगावी फिरू तरी शकल्या असत्या काय ?
समस्त स्त्रीयांकडून, पुरूषांकडून विशेषत: ब्राम्हण समाजाकडून या अपर्णाकाकूंचा तीव्र शब्दात निषेध झाला पाहिजे.